ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची यांची घोषणा

hake

पुणे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. ते अपक्ष म्हणून लढणार की कोणत्या राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने मैदानात उतरणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. माध्यमांशी बोलताना हाके यांनी, “मी सोमवारी अर्ज भरणार असून राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात आहे,” असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नेमका कोणता राष्ट्रीय पक्ष त्यांच्या संपर्कात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिल असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आतापर्यंत १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यामध्ये बिग बॉस फेम अभिजित बिचकुले यांचाही समावेश आहे. काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस माघार घेणार की स्वतंत्र उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तसेच लक्ष्मण हाके हेही त्याच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत.

Latest News