फुकेत (थायलंड) हिंदू – महाराष्ट्रीयन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ. सुनील व्ही. मांजरेकरांचा पुढाकार!“ पर्यटनासोबतच फुकेत (थायलंड) मध्ये भारतीयांसाठी रियल इस्टेट गुंतवणुकेचे नवनवे पर्याय

ps

डॉ. सुनील व्ही. मांजरेकर

मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) हिंद महासागराच्या निळ्याशार लाटांनी सजलेले, डोंगररांगा आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी नटलेले थायलंडमधील फुकेत हे आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे असलेले ठिकाण आहे. परंतु आता फुकेतची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता, भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयनांसाठी एक नवीन सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र म्हणूनही विकसित होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दुबईस्थित उद्योजक आणि ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’चे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांनी फुकेतमध्ये मराठी संस्कृती रुजवण्यासोबतच रिअल इस्टेट गुंतवणुकीचे नवे दालन खुले केले आहे. त्यांच्या या उपक्रमाविषयी आम्ही त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…

प्रश्न : फुकेतसारख्या परदेशी ठिकाणी मराठी संस्कृती रुजवण्याची प्रेरणा कशी मिळाली?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : ‘फुकेत ९’च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांच्यामुळे. त्यांनी फुकेतमध्ये उभारलेली श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती पाहिल्यावर मन भरून आले. परदेशातही आपल्या संस्कृतीबद्दल इतकी श्रद्धा आणि आकर्षण आहे, हे पाहून खूप प्रेरणा मिळाली. मंदिरात होणाऱ्या पूजा, आरती आणि भजनांमध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून जाणवले की, भारतीय संस्कृती ही जागतिक स्तरावर लोकांना जोडणारी ताकद आहे. याच भावनेतून हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश काय आहे?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : आमचा उद्देश दुहेरी आहे – एक म्हणजे मराठी आणि भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रसार करणे, आणि दुसरे म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, फायदेशीर आणि स्थिर गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देणे. फुकेत हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भविष्यातील गुंतवणुकीचे मजबूत केंद्र बनत आहे.

प्रश्न : सध्याच्या परिस्थितीत फुकेतमध्ये गुंतवणूक करणे किती योग्य ठरू शकते? ही योग्य वेळ आहे का?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : निश्चितच, सध्याची वेळ गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल आहे. जागतिक स्तरावर आर्थिक चढ-उतार सुरू असताना, सुरक्षित आणि स्थिर पर्याय म्हणून रिअल इस्टेटकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतो. अशा पार्श्वभूमीवर फुकेतमधील गुंतवणूक ही खऱ्या अर्थाने एक ‘सुवर्णसंधी’ आहे. फुकेत हे वर्षभर चालणारे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ सतत कायम असतो. या प्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा, उच्च दर्जाची सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय जीवनशैलीचा उत्तम समन्वय साधल्याने या गुंतवणुकीवर साधारणतः किमान १०% परतावा (ROI) अपेक्षित आहे. तसेच, आपल्या गुंतवणूकदारांनी मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिचे व्यवस्थापन आणि भाड्याने देण्याची जबाबदारी मीपा यांच्या संस्थेकडून घेतली जाते. वर्षभरात सुमारे ७०% ‘ऑक्युपन्सी’ असल्यामुळे गुंतवणूकदारांना सातत्याने उत्पन्न मिळते. यासोबतच त्यांच्या मालमत्तेची किंमतही दरवर्षी वाढत असल्याने ही गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आणि दीर्घकालीन दृष्टीने सुरक्षित ठरते.

प्रश्न : ‘फुकेत ९’ या प्रकल्पांची वैशिष्ट्ये काय आहेत?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : ‘Phuket9’ ही कंपनी 2004 पासून या क्षेत्रात कार्यरत असून विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. त्यांचा फुल-सायकल अ‍ॅप्रोच – म्हणजे मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापन – गुंतवणूकदारांसाठी मोठा आधार ठरतो. आम्ही SQCC Properties LLC (Dubai) आणि Phuket 9 Real Estate Development (Thailand) यांच्या सहकार्याने ‘फुकेत ९’ प्रकल्प राबवत आहोत. समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे प्रकल्प उभे राहत आहेत. हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांसारख्या विविध पर्यायांमुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला योग्य पर्याय मिळतो. याशिवाय, पूर्ण प्रॉपर्टी मॅनेजमेंट सेवा उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांना कोणतीही अतिरिक्त काळजी घ्यावी लागत नाही.

प्रश्न : ‘Phuket9’ च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांच्यासोबत काम करताना तुम्हाला नेमका कसा अनुभव आला? त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला सर्वाधिक काय भावले?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : खरं सांगायचं तर मीपा यांच्यासोबत काम करणं हा केवळ व्यावसायिक अनुभव नाही, तर तो एक सांस्कृतिक आणि भावनिक प्रवास आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारं आहे. त्यांनी फुकेतमध्ये उभारलेल्या ‘दगडूशेठ हलवाई गणपती’ मंदिरात त्या नित्यनेमाने श्रद्धेने पूजा-अर्चा करतात – ही गोष्टच त्यांच्या संस्कारांची साक्ष देते. विशेष म्हणजे, त्या भारतात येऊन पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर महिन्याला किमान एकदा जाऊन दर्शन घेतात. एका परदेशी व्यक्तीला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल इतकी ओढ आणि आदर आहे, हे पाहून मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. त्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने जोडतात. फुकेतमध्ये भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांनी यावं, आपल्या संस्कृतीचा विस्तार करावा आणि तिथे स्वतःचं एक घर निर्माण करावं, असं त्यांना वाटतंय. त्यांच्या दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प केवळ व्यवसाय न राहता, दोन संस्कृती जोडणारा आणि नाती निर्माण करणारा एक सुंदर उपक्रम बनतो.

प्रश्न : या प्रकल्पाला महाराष्ट्रातून कसा प्रतिसाद मिळत आहे?
डॉ. सुनील व्ही. मांजरेकर : मुंबईतील JW Marriott, सहार येथे झालेल्या परिषदेत महाराष्ट्रभरातून उद्योगपती आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ही एक ‘सुवर्णसंधी’ असल्याची प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, मराठी संस्कृतीची जोड असल्यामुळे भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर लोक या प्रकल्पाशी जोडले जात आहेत. आम्ही फुकेतमध्ये भारतीय समुदायासाठी एक मजबूत नेटवर्क उभे करण्याचा विचार करत आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम आणि व्यवसायाच्या संधी यांचा एकत्रित विकास करून एक ‘मिनी महाराष्ट्र’ उभारण्याचे आमचे स्वप्न आहे.


फुकेतमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी आणि संधी जाणून घेण्यासाठी

Ms. Shreya Manjjarekar, SOC Corporation Properties LLC, Tel : +971 50 472 9635, +97145136075 Mob: +971505343653, sunil@sqccproperties.com मेलवर किंवा www.sqccproperties.com या वेबसाइटला भेट द्यावी.

Latest News