पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…!

pcmc-2

पिंपरी, (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या सभेत शहरातील आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्यांसह महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात आरोग्य शिबिर, भूमिपूजन, उद्घाटन, जयंती इत्यादींसाठी मंडप स्टेज व्यवस्था करणे, आकुर्डी हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, मनपा कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कार्यालयांनी कचरा संकलन व अलगीकरण जनजागृती करणे व शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती संस्थांची नेमणूक करणे, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता व पटसंख्या वाढवण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देणे, मनपाच्या विविध विभागांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार ६५ इंची एलईडी टीव्ही (२० नग) एक वर्ष कालावधीकरिता खरेदी करणे, प्रभाग क्रमांक ३१, ३२ नवी सांगवी, जुनी सांगवी येथे आवश्यकतेनुसार नवीन बोअरवेल घेणे व जुन्या बोअरवेलची देखभाल दुरुस्ती करणे, मनपाच्या चार शाळांसाठी स्मार्ट किड्स फिटनेस इक्विपमेंट साहित्य चार किट खरेदी करणे, ह क्षेत्रीय कार्यालयातील विविध प्रशासकीय इमारती, शाळा व कार्यालयांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती करणे, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात फायर सेफ्टी ऑडिटनुसार अनुषंगिक कामे करणे व देखभाल-दुरुस्ती कामे करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व मैला शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये फलक लावणे व अनुषंगिक कामे करणे, नवीन तालेरा येथे विविध विद्युत विषयक कामांसाठी कुशल कर्मचारी पुरवणे व इतर अनुषंगिक कामे करणे, रावेत येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुलावरून सुशोभीकरण अंतर्गत डेकोरेटिव्ह फिटिंग पोल बसविणे व अनुषंगिक विद्युत विषयक कामे करणे, मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व मनपा उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता रेडिओ स्टेशनवरून जाहिराती प्रसिद्ध करणे, उद्यान वृक्ष संवर्धन विभागासाठी संगणक प्रणालीद्वारे कामांचे

सहनियंत्रण करण्यासाठी वेब व मोबाईल आधारित संगणक प्रणाली विकसित करणे, जिजामाता पिंपरी आकुर्डी मासुळकर हॉस्पिटल येथील ईटीपी विषयक चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणे, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाणमधील परिसरातील किरकोळ देखभाल-दुरुस्ती व अनुषंगिक इतर स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये डीपी रस्त्यालगत फुटपाथ विकसित करणे व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक २४ थेरगाव येथे आवश्यकतेनुसार ब्लॉक फुटपाथ, डिव्हायडर व नाला-दुरुस्तीची कामे तसेच इतर स्थापत्य विषयक कामे करणे, केंद्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रकल्पाचे कामकाज चालवण्यासाठी एजन्सीची निवड करणे, आकुर्डी येथील कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयातील क्ष-किरण विभागाकरिता आवश्यक असलेली डिस्कॉम संगणक प्रणाली कार्यान्वित करणे, महानगरपालिकेचे औद्योगिक प्रशिक्षण विभागांच्या नियंत्रणाखाली असणारे आकुर्डी माध्यमिक विद्यालय येथील एमएससीआयटी केंद्राचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करणे, मनपाचे नेत्र रुग्णालय व भोसरी रुग्णालय येथे फायर ऑडिट करणे, अहवालाप्रमाणे कामे करणे व अनुषंगिक कामे करणे, क्रांतिवीर चापेकर बंधू

राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड येथील संग्रहालयाच्या स्वच्छतेविषयी कामाकरिता दोन कर्तव्यतत्पर आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करणे, प्रभाग क्रमांक २५ येथील पुणे-बेंगलोर हायवेच्या पूर्वेकडील वाकड-पुनावळे-ताथवडे व प्रभागातील इतर परिसरातील नव्याने ताब्यात येणारे रस्ते विकसित करणे, प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, खुशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्तीची कामे करणे, आवश्यकतेनुसार पाइपलाइन टाकणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करणे, प्रभाग क्रमांक १४ काळभोर नगर व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणे, नेहरूनगर श्वान निय…

Latest News