पिंपरी बाजारपेठेतील पुलाशेजारील एसआरए प्रकल्प तातडीने स्थगित करा – युवराज दाखले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. ०८:(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी मार्केट परिसरातील पुलाशेजारी सुरू असलेल्या सॅनिटरी चाळ एसआरए प्रकल्पाला स्थगिती द्यावी, अशी मागणी *शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराज दाखलेयांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून भविष्यात पिंपरी मार्केट परिसरातील पुलाचे रुंदीकरण अथवा दुरुस्तीचे काम हाती घेतले जाऊ शकते.अशा परिस्थितीत पुलाशेजारी सुरू असलेला एसआरए प्रकल्प प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो, असा दावा युवराज दाखले यांनी निवेदनात केला आहे.
“पिंपरी मार्केट हा शहराचा मध्यवर्ती व अत्यंत वर्दळीचा भाग आहे. येथे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. भविष्यात मेट्रो विस्तार, बीआरटी कॉरिडॉर किंवा पुलाचे रुंदीकरण झाले तर पुलाशेजारील इमारतीमुळे विकास कामांना अडथळा निर्माण होईल. त्यामुळे आत्ताच दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणे गरजेचे आहे,” असे युवराज दाखले म्हणाले.
युवराज दाखले यांच्या प्रमुख मागण्या:
- सॅनिटरी चाळ एसआरए प्रकल्प तात्काळ स्थगित करावा.
- शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा व भविष्यातील विकास आराखड्याचा विचार करून प्रकल्पाचा फेरविचार करावा.
- पिंपरी मार्केट परिसरातील पुलासाठी आवश्यक भूसंपादनाची तरतूद करून ठेवावी.
एसआरए प्राधिकरण व मनपा यांनी संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करावा.
- स्थानिक व्यापारी व नागरिकांची मते जाणून घेतल्याशिवाय प्रकल्प पुढे रेटू नये.
“विकासाच्या नावाखाली भविष्यातील विकासालाच खीळ बसता कामा नये. पिंपरीच्या हृदयात चुकीच्या ठिकाणी एसआरए प्रकल्प उभा राहिला तर पुढील 50 वर्षे शहराला त्याचे परिणाम भोगावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा प्रकल्प स्थगित करावा,” अशी आग्रही मागणी युवराज दाखले यांनी केली आहे.
- युवराज भगवान दाखले
संस्थापक अध्यक्ष, शिवशाही व्यापारी संघ
मुख्य प्रवक्ते, हिंदू मातंग सेना
संपर्क: 9922373959
