Pune Crime: तू माझ्यासोबत का राहत नाहीस? एका माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर असिड हल्ला..

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर अः सिड हल्ला केला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. तरुणी मित्रासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याच्या रागातून हा अः सिड हल्ला केल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलेले आहे.
“तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,” असे म्हणत एका माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर असिड हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. श्रीराम मधु सरुनवर (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हा सगळा प्रकार २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्याच्या एका हॉटेल मध्ये काम करतात. काम संपल्यानंतर बुधवारी पहाटे दोघेही ताडीवाला रोड येथील आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते.
याच वेळी आरोपी सरुनवर दबा धरून बसला होता.
पीडित तरुणी ही त्याचा रोष झुगारून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहते, याचा राग त्याच्या मनात होता. श्रीरामने तिचा रस्ता अडवला आणि “तु माझ्यासोबत का राहत नाहीस? तु माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली.
काही समजण्याच्या आतच, आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रममधील ‘असिड’सारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. हे केमिकल तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर पडल्याने ती जागीच होरपळली. आरोपीने तिच्या मित्रांवर सुद्धा असिड फेकले, ज्यामुळे त्याच्याही पायाला गंभीर दुखापत झाली.
दोघेही वेदनेने ओरडत असताना आरोपी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शहराच्या मध्यवस्तीत तरुणीवर अ. सिड हल्ला झाल्याचे समजताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत हुबळी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
