सिलेंडरमध्ये गॅसऐवजी पाणी जवळपास ३ ते ४ लिटर, तर काही सिलेंडरमध्ये तब्बल १० किलोपर्यंत पाणी….

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) जय भवानी वसाहतीतील स्थानिकांनी तक्रार केली आहे की, त्यांना पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये पाणी आढळले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनुसार, जवळपास ३ ते ४ लिटर, तर काही सिलेंडरमध्ये तब्बल १० किलोपर्यंत पाणी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, सिलेंडर नीट काम करत नव्हता त्यावेळी त्याची तपासणी करण्यात आली. यावेळी सिलेंडरमध्ये गॅस ऐॅवजी पाणी आढळले.या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मूलभूत गरजांसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. लोकांनी संताप व्यक्त करत, आम्ही पैसे भरतो, याचे मिळते काय, पाणी? असा प्रश्न केला आहे.लोकांनी याबाबत गॅस एजन्सीकडे तक्रारी देखील केल्या आहे. यामुळे स्थानिक ग्राहकांनी फसवणूक आणि पुरवठ्यात सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या प्रकरणाची चौकशी करावी असे नागरिकांचे म्हटले आहे. तर घरगुती गॅस सिलेंडर वितरकाने सिलेंडर थेट कंपनीकडून येतो असे सांगत या घटना कमी घडतात असे म्हटले आहे.
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जय भवानी जनता वसाहतीत एका घरगुती LPG सिलेंडरमधून गॅसऐवजी चक्का पाणी आढळ्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या घटनेचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नागरिक सिल बंद सिलेंडरची तपासणी करत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की सिलेंडरमध्ये पेन सारखी वस्तू घातल्यानंतर त्यातून पाणी पडताना दिसत आहे.
एकीकडे अमेरिका इराण युद्ध पेटले आहे, ज्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होऊन जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे संपूर्ण जगावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहे. तसेच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरही महागले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचे फटके बसत आहे. अशा परिस्थितीत
२८ फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरु केली होती. या लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला असून मध्यपूर्व पेटून उठले. इराणने संतप्त होत जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी वाहतूकीचा मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. परिणामी या मार्गावरुन सौदी अरेबिया, यूएई, यांसारख्या देशांकडून होणारी कच्चे तेल आणि वायू वाहतूक थांबली आणि जागतिक बाजरपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले. ज्याचा भारताला मोठा फटका बसला आहे. या मार्गावरुन इराणकडून होणार तेल आणि वायू पुरवठा देखील थांबला असल्याने देशात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ज्याचा सर्वसामान्यांना चांगला फटका बसत आहे.
