बॉसने ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याचा वारंवार विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर, हिंजेवाडी पोलिसांनी केली अटक…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
हा संतापजनक प्रकार औंध येथील एका इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घडला आहे. त्या बॉसने आपल्या महिला कर्मचाऱ्यांचा वारंवार विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पीडित महिला कर्मचाऱ्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर, आज हिंजवडी पोलिसांनी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याला बेड्या ठोकल्या आहेत.
मोहम्मद सय्यद हा आपल्या इन्शुरन्स कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्यांच वारंवार विनयभंग करत होता. तसेच तिच्यासोबत फोनवर कामा व्यतिरिक्त बोलायचा.
बॉसने ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्याचा वारंवार विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वारंवार विनयभंग करणाऱ्या आरोपी बॉसला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास करण्यात येत आहे. मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असे आरोपी बॉसचे नाव आहे.
त्या महिलेला लोणावळा येथे जेवण करण्यासाठी घेऊन जायचा अन् विनयभंग करायचा, असा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली. राजस्थानमधून पुण्यात विक् साठी आणलेले जवळपास 10 किलो 300 ग्रॅम अफूची बोंड हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहेत. सिगरेटमध्ये नशा करण्यासाठी अफूच्या बोंडाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने हिंजवडी पोलिसांनी मान गाव परिसरात सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या. त्या आरोपीकडून जवळपास 10 किलो 300 ग्रॅम अफूची बोंड जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या अफूच्या बोंडाची किंमत अंदाजे दीड लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
