दौंड: केडगाव परिसरात एक मोठं आणि धक्कादायक बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण उघडकीस..

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
गर्भलिंगनिदानासाठी वापरलं जाणारं बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आरोपी अण्णासाहेब गिरी याला नरेंद्र ठाकरे याने पुरवलं असल्याची माहिती मिळालीये. सध्या नरेंद्र ठाकरे न्यायालयीन कोठडीत आहे. या सर्व घडामोडींमुळे या रॅकेटमध्ये अजून किती लोक सहभागी आहेत, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाने केवळ पोलीसच नाही तर जिल्हा आरोग्य विभागालाही सतर्क केलं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अण्णासाहेब गिरीचे एजंट कार्यरत असल्याची माहिती समोर आलीये. या एजंटांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनधिकृतपणे गर्भलिंगनिदान केलं गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा साथीदार डॉ. अतुल जाधव यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू असून, चौकशीदरम्यानच फरार असलेल्या दोन्ही डॉक्टरांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आलीये.
या पार्श्वभूमीवर संबंधित रुग्णालयं आणि वैद्यकीय केंद्रांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिलीये, अशा बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात एक मोठं आणि धक्कादायक बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील अवैध वैद्यकीय धंद्यांचं मोठं जाळं समोर येण्याची शक्यता निर्माण झालीये. या कारवाईत आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात भोर तालुक्यातील किकवीमध्ये डॉ. मंदार माळी आणि उरुळी कांचनमधील येथील सुंदरम कदम यांचं नाव समोर आलं आहे. हे दोघेही सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या मते, हे दोघं या संपूर्ण स्केटमध्ये एक्टिव्ह होते.
