उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का….

मुंबई | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) सचिन अहिर यांच्या या धक्कादायक पाऊलानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, सचिन अहिर हे मूळ शिवसैनिक आहेत. त्यांनी कोणतेही पक्षांतर केलेले नसून त्यांनी स्वतःच्या मूळ शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात (उबाठा) असणारा अंतर्गत असंतोष या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उघडा पडला आहे.पुढील बोलताना शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटात राहून काम करताना अनेक नेत्यांची मानसिकता आता ढासळली आहे, म्हणूनच हे सगळे नेते आणि लोकप्रतिनिधी आमच्याकडे येत आहेत. सचिन अहिर यांना तिकडे सातत्याने दाबण्याचा आणि त्यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न झाला होता. आज जो काही प्रकार घडला आहे, तो त्यांच्या मनातील त्याच त्रासाचा आणि असंतोषाचा मोठा स्फोट आहे.राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू असतानाच विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या धामधुमीत झालेल्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे आता विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि वादळी ठरणार हे स्पष्ट झाले आहे. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या घटनेला आठ दिवसही उलटत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हा दुसरा मोठा धक्का दिला आहे.
