पिंपळे सौदागर मध्ये रस्त्यासाठी भाजप शहराध्यक्ष काटे च्या विरोधात नागरिकांचा आक्रोष

किती वर्षे झाली …१० वर्षे झाली ..भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात नागरिकांचा रस्त्यासाठी आक्रोश …
पिंपरी ( ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर आणि ट्रायोज सोसायटीला जाणाऱ्या १८ फुटी रस्त्यासाठी पिंपळे सौदागर येथील महिला व पुरुष आक्रमक झाले आणि त्यांनी भर रस्त्यावर आंदोलन केले ” किती वर्षे झाली….१० वर्षे झाली” अशा घोषणा देत पिंपळे सौदागर परिसर दणाणून सोडला.
यावेळी महापालिका अधिकारी व सत्ताधारी भाजपचे शहराध्यक्ष स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तब्बल एक तास हे आंदोलन सुरू होते.पिंपळे सौदागर हा परिसर उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखला जातो.
आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांचा हा परिसर आहे. झुलेलाल टॉवर आणि ट्रायोज सोसायटी सारख्या असंख्य सोसायटीमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. मागील १० वर्षापासून १८ फुटी रस्त्याचे काम सुरु आहे.राडारोडा आणि चिखल यामुळे रस्त्याने जाणे अशक्य झाले असून शाळेच्या हॅन, कामवाली कर्मचारी आमच्याकडे कामासाठी रस्त्यामुळे येत नाहीत,आम्ही पिंपरी महापालिकेला भरपूर वेळेवर टॅक्स भरतो मग ही रस्त्याची दुरावस्था का ? आम्ही किती वर्षे हा त्रास सहन करायचा ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून भर रस्त्यामध्ये आंदोलन केले. आंदोलनस्थळी पिंपरी महापालिकेचे अधिकारी व स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
