रील स्टार माधवी कुंभारसह 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – माधवी कुंभार आणि अथर्वं जगताप हे दोघेही सोशल मीडिया रिलस्टार असून एकमेकाच्या परिचयाचे आहेत. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठार येथे स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यातील एका गटात माधवी कुंभार तर दुसऱ्या गटात अथर्व जगताप होता.त्यामुळे जुन्या वादाचा राग आणि मनात खदखदत असल्यामुळे माधवीनं साथीदारांसह डेक्कन परिसरातील कॅफे फ्लाईंग जिप्सी अथर्व जगताप दिसताच “तू पोरींना काय बोलला, आमच्यासोबत चल, तुला दाखवते’ असं म्हणत अथर्वला शिविगाळ केली. तसंच अथर्वच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याचीही माहिती समोर आलीय.
‘इन्स्टा’च्या कमेंट अन् लाईकवरुनही अथर्व आणि माथवी कुंभारमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे… त्यामुळे पुण्यासारख्या शिक्षण व विद्यद्येच्या माहेरघरात सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा गैरवापर करत तरुणाई अशा हिंसक मार्गावर जात असेल. तर पुणे
पोलीस नेमकं काय करतायत?
रील स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर जर गैंगवॉर करू लागले तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? आधी पुण्यातील गुन्हेगारांनी पोलीसांना हैराण केलेले असताना दुसरीकडे रिलस्टारच गैंगस्टर झाल्यानं पुण्यातली गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढचतच चाललीय. त्यामुळे पुणे पोलिसांचा खुळखुळा झालाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
पुण्यात गैंग वॉर काही नवं नाही. कोयता गँगगही तुम्ही पाहिली… मात्र आता
पुण्यातले रिलस्टारच गैंगस्टर झाले आहेत. कारण या गुन्हेगारीचे लोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार्सपर्यंत पोहोचलंय. पुण्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या डेक्कन जिमखाना परिसरातील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’ मध्ये 19 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप यांच्यावर एका गटाने कोयत्यान हल्ला केला. ज्या प्रकरणात आता रिलस्टार माधवी कुंभारसह 7 जणांना अटक करण्यात आलीय. मात्र रिलस्टारमधील या वादामागे नेमकं काय कारण आहे?
पाहूयात
पुण्यात रिलस्टार की गँगस्टर ?
घटनेचा मुख्य घटनाक्रम
- घटना: डेक्कन जिमखाना परिसरातील ‘कॅफे फ्लाईंग जिप्सि’ येथे १९ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अथर्व जगताप याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
- कारण: काही महिन्यांपूर्वी सातारा येथील कास पठारवर स्टंटबाजी करताना कारला कट मारल्याच्या कारणावरून अथर्व जगताप आणि रील स्टार माधवी कुंभार यांच्या गटांमध्ये वाद झाला होता.
- कार्रवाई: या प्रकरणी रील स्टार माधवी कुंभारसह ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्य मुद्दे व चिंता
- वाढती गुन्हेगारी: सोशल मीडियावरील प्रसिद्धी, कमेंट्स आणि लाईक्सच्या वादातून तरुण हिंसक मार्गावर जात असल्याचे दिसून येते.
- सुरक्षेचा प्रश्न: रील स्टार्स आणि इन्फ्लुएन्सर्स जर अशा प्रकारे कायद्या हातात घेऊ लागले, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
