गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची जबाबदारी…

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखा तसेच शहरातील महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांची जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.शहराचा वाढता विस्तार आणि त्यासोबत वाढणारी गुन्हेगारी, वाहतूक कोंडी तसेच कायदा-सुव्यवस्थेची आव्हाने लक्षात घेता या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून गुन्हेगारीविरोधातील कारवाईला गती देणे, वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर राहणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, बदलीवर नव्याने रुजू झालेल्या १० पोलिस निरीक्षकांना विविध ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
नियुक्त झालेले अधिकारी
अमोल चंद्रकांत गवळी — गुन्हे शाखा
देवेंद्र परशराम चव्हाण — पोलिस आयुक्तांचे वाचक
हेमंत पोपटराव कदम — विशेष शाखा
राजेन्द्र जयवंत निकाळजे — वाहतूक शाखा
सिद्धराम महादेव म्हेत्रे — हिंजवडी पोलिस ठाणे
गीताराम लक्ष्मण शेवाळे — नियंत्रण कक्ष
विजयकुमार गोरख शिंदे — पिंपरी पोलिस ठाणे
प्रशांत ज्ञानोबा आरदवाड — चाकण उत्तर पोलिस ठाणे
सुरेखा शरद घार्गे — गुन्हे शाखा
चंद्रकांत विनायक जाधव — निगडी पोलिस ठाणे
नव्या नियुक्त्यांनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीविरोधातील कारवाई,
वाहतूक नियमन आणि पोलिस प्रशासनाच्या कामकाजाला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
