चेंबरमध्ये काम करत असताना 2 कामगार दुर्दैवी मृत्यू

man hole chamber

पिंपरी |(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- दोन्ही कामगार चेंबरमध्ये काम करण्यासाठी उतरले होते. रात्री सुमारे मध्यरात्रीच्या सुमारास ते चेंबरमध्ये अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करून दोन्ही कामगारांना चेंबरमधून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, याच मॅनहोलमध्ये सुमारे वर्षभरापूर्वी तीन बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

आता अमोल आणि मनोज यांच्या मृत्युमुळे याच मॅनहोलशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे.वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मॅनहोलमध्ये कामगारांना उतरवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जातात का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, कामगारांना चेंबरमध्ये पाठवण्यापूर्वी कोणती सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.  निगडी प्राधिकरण परिसरात लोकमान्य हॉस्पिटलजवळ बुधवारी (२६ ऑगस्ट) रात्री मॅनहोलच्या चेंबरमध्ये साफसफाईचे काम करत असताना दोन कामगार अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांची नावे अमोल शिंदे (२०) आणि मनोज शिंदे (२६) अशी आहेत.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे विषारी वायू, ऑक्सिजनची कमतरता किंवा अन्य कारण याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

Latest News