गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथील विद्यार्थिनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिघी आर्मी कॅन्टोन्मेंटला भेट….

मोशी :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – त्याग आणि देशसेवेबद्दल माहिती जाणून घेतली. तसेच त्यांना सलाम करून राष्ट्रसेवेचा गौरव केला. या भेटीतून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.या उपक्रमाला गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव भोंगाळे, संचालक श्री. योगेश भोंगाळे,
उपसरसेविका मा. सौ. कविताताई भोंगाळे-पाटील, संस्थेचे सचिव मा. श्री. संजय भोंगाळे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत तसेच संस्थेचे विपणन अधिकारी मा. श्री. शैलेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मोशी येथील विद्यार्थिनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिघी आर्मी कॅन्टोन्मेंटला भेट देत भारतीय जवानांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव उत्साहात साजरा केला.यावेळी विद्यार्थ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या जवानांना प्रेमाने राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्य, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि भारतीय सैनिकांविषयी आदरभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सैनिकांसोबतचा हा अविस्मरणीय अनुभव आयुष्यभर जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
