1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम…

mahagai

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चापासून गुंतवणूक आणि टॅक्सशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम ग्राहक, करदाते, गुंतवणूकदार आणि प्रवाशांवर होऊ शकतो. पुढील बातमीत आपण ९ महत्त्वाचे बदल जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिलासाः १ सप्टेंबरपासून भारतातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंग पासवर इमिग्रेशन स्टॅम्प घेण्याची गरज राहणार नाही. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंटेड बोर्डिंग पासचा वापर करता येईल.

LPG e-KYC महत्त्वाची: घरगुती LPG ग्राहकांसाठी बायोमेट्रिक e-KYCची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असल्याचे सांगण्यात आलेले आहे. e-KYC पूर्ण केली नाही तर पुढे रिफिल बुकिंग किंवा सब्सिडीचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.

मुंबईत दूध महागणारः १ सप्टेंबरपासून मुंबईत ताज्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात १९ प्रति लिटर वाढ होणार असून दर ₹१०२ प्रति लिटरपर्यंत जाणार आहेत. हे दर पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील.

ऑटो-टॅक्सी प्रवास महागणारः मुंबईकरांसाठीही सप्टेंबर महिना महागाईचा धक्का घेऊन येत आहे. १ सप्टेंबरपासून ऑटो-रिक्षा आणि टॅक्सीच्या बेस फेअरमध्ये वाढ होणार असल्यामुळे दैनंदिन प्रवासाचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये गुंतवणूक, कर, LPG आणि रोजच्या प्रवासाशी संबंधित बदलांकडे नागरिकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

डीमॅट आणि म्युच्युअल फंड नॉमिनेशनः १ सप्टेंबरपासून डीमॅट अकाउंट आणि म्युच्युअल फंड फोलिओसाठी नॉमिनेशनशी संबंधित नवीन मार्गदर्शक नियम लागू होणार आहेत. गुंतवणूकदारांनी आपले नॉमिनेशन स्टेटस तपासणे त्यासाठी महत्त्वाचे आहे.

ETF चे नवे नियमः SEBI चे नवीन ETF फ्रेमवर्क ७ सप्टेंबर २०२६ पासून लागू होणार आहे. यात बेस प्राइस, प्राइस बँड, प्री-ओपन कॉल ऑक्शन आणि क्लोज-आउट प्रोसेसमध्ये बदल होणार आहेत.
FCNR(B) स्पेशल स्वॅप विंडो बंदः RBIची FCNR (B) ठेवींसाठी विशेष डॉलर-
रुपया स्वॅप सुविधा ३१ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून नव्या FCNR (B) ठेवींना या विशेष सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

अॅडव्हान्स टॅक्सची पुढील मुदतः करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२६ ही अॅडव्हान्स टॅक्सच्या पुढील हप्त्याची शेवटची तारीख आहे. पात्र करदात्यांना आतापर्यंत किमान ४५ टक्के देण्याची रक्कम जमा करणे गरजेचे आहे.
स्मॉल सेव्हिंग्सच्या व्याजदरांकडे लक्षः PPF, सुकन्या समृद्धी आणि NSCसारख्या योजनांच्या ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ तिमाहीतील व्याजदरांची सरकारकडून ३० सप्टेंबरपर्यंत समीक्षा (Review) होण्याची शक्यता आहे.

Latest News