पिंपरी महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे निलंबित ! खातेनिहाय चौकशीचे आयुक्त सूर्यवंशी यांचे आदेश!

पिंपरी महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे निलंबित ! खातेनिहाय चौकशी चे आयुक्त सूर्यवंशी यांचे आदेश!
पिंपरी / प्रतिनिधी/पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांना निलबिंत करून आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आले आहेत
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तधारी भाजपाचे विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी दोन दिवसापूर्वी महापालिका बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व इतरांच्या विरोधी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली व मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकान्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती
.या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होते. नगरसेवक तुषार हिंगे यांनी बांधकाम परवानमी विभागात परवानगी मी देताना ५ ते ६ टक्के रक्कम घेतली जात असल्याचा आरोप केला होता. हिंगे यांनी केलेला आरोप खरा की खोटा याबाबत चर्चा सुरु असतानाच आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांना सेवा निलंबित केले असून त्याबाबतचा आदेश रात्री उशिरा काढला आहे
.महापालिकेतील कारभार, परवानगी प्रक्रिया आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ !प्रकरण नेमके काय आहे …पुनवळे येथील सिटी सर्व क्रमांक ६९,७०,७२,७३,७४,७५,७७,७८,७९ येथील भूखंडावर निवासी व बिगर निवासी इमारत बांधकामासाठी परवानमी दिलेली आहे
. भोगवटा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रशासन शुल्क आकारताना चुकीच्या पढतीने आकारणी करण्यात आली. याच प्रकरणी परवागीसाठी पैशाची मागणी केल्याची तुषार हिंगे यांनी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेऊन संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना देण्यात आले होते.
यानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी दोन्ही अधिकान्यांना खुलासा करण्यांचे निर्देश दिले. दोन्ही अधिकान्यांनी खुलासे केले मात्र सदरील खुलासे समाधानकारक नसल्याचे सांगून आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता विजय सोनवणे व उपअभियंता अशोक मोरे यांना सेवानिलंबित करून खातेनिहाय चौकशीचे आदश दिले आहेत.
