ग्रीन मार्शल तृतीयपंथीयांचे काम बंद;पिंपरी चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख प्रदीप टेंगल यांच्या विरोधात गैरवर्तनाची आयुक्त सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार:

pcmc-2

ग्रीन मार्शल तृतीयपंथीयांचे काम बंद; अधिकाऱ्याविरोधात गैरवर्तनाची तक्रार

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत ‘ग्रीन मार्शल’ म्हणून कार्यरत तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांचे काम अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ती अर्चना मेंगडे यांच्याशी सहाय्यक आयुक्त श्री. टेंगल यांनी कथितपणे गैरवर्तन व अरेरावी केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग व प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तृतीयपंथीयांचे काम कोणाच्या आदेशाने बंद करण्यात आले, इतर संस्थांना मुदतवाढ देताना या संस्थेला वेगळी वागणूक का देण्यात आली, याचीही चौकशी करण्याची मागणी आहे.

सहाय्यक आयुक्त श्री. टेंगल यांच्याकडून माझ्याशी तसेच संबंधित तृतीयपंथीय महिलांशी अश्लील चाळे, गैरवर्तन, अरेरावीची भाषा व अवमानकारक पद्धतीने वागणूक देण्यात आल्याची गंभीर बाब माझ्या निदर्शनास आली आहे त्यामुळे त्याची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी आयुक्त सूर्यवंशी याच्याकडे करण्यात आली

महानगरपालिकेच्या स्वच्छता व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून, तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. मात्र, संबंधित तृतीयपंथीयांचे काम अचानक बंद करण्यात आल्याची माहिती दिली

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय संबंधित व्यक्तींचे काम बंद करण्याचा निर्णय कोणी घेतला, कोणत्या अधिकाराअंतर्गत घेतला आणि त्यामागील कारण काय, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागील सुमारे चार वर्षांपासून तृतीयपंथीय व्यक्ती विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांच्या कामाबाबत महानगरपालिकेकडे कोणतीही गंभीर तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. उलट, त्यांनी महानगरपालिकेच्या कामात योगदान दिले असून, त्यांच्या माध्यमातून सामाजिक समावेशनाचा सकारात्मक संदेश समाजात गेला आहे.

Latest News