24 तासात 324 रुग्ण आढळले-केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांमध्ये ३२४ रुग्ण सापडले असून आता एकूण बाधितांची संख्या १९६५ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी धारावीत आढळलेल्या कोरोनाबाधिताचीही माहिती देण्यात आली. धारावीत ज्याठिकाणी रुग्ण आढळला तो परिसर सील करण्यात आला आहे. तर, देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२ रुग्ण मृत झाले आहेत. तर एकूण मृतांची संख्या ५९ आहे. मरकझला एकूण ९ हजार लोक एकत्र जमले होते. या ९ हजार लोकांची ओळख पटली असून त्यांतील १ हजार ३०० नागरिक परदेशी आहेत. मरकजला गेलेल्या १८०० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सध्या टेस्ट, आयसोलेशन आणि क्वारंटाइनवर भर देण्यात येतेय, असं सांगण्यात आलंय.