पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट फिरणाऱ्या119 जणांवर गुन्हा दाखल

FB_IMG_1585490931227

पिंपरी (प्रतिनिधी) – संपूर्ण शहरात संचारबदीचे आदेश लागू आहेत. तरीदेखील शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या 119 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून देशात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र संचारबंदीचे आदेश झुगारून शहरात मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही.

शनिवारी शहरात मोकाट फिरणाऱ्या आणि तोंडावर मास्क न लावणाऱ्या तब्बल 119 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तर आत्तापर्यंत दोन हजाराहून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आळंदी (05), तळेगाव एमआयडीसी (01), हिंजवडी (21), देहूरोड (02), एमआयडीसी भोसरी (07), भोसरी (13) चाकण (15), चिंचवड (23) दिघी (24), तळेगाव दाभाडे (06), चिखली (01), रावेत चौकी (01)

Latest News