कोल्हापूरमध्ये 33 निगेटिव्ह रिपोर्ट दिलासादायक

1586682745555

कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणे कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशातच काल 37 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. त्यामुळे कोल्हापूरकरांची धाकधूक काहीशी वाढली होती. मात्र यातील 33 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूरमधून पाठवलेल्या 37 पैकी 33 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर 4 जणांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला आहे. सध्या कोल्हापूरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 असून या संख्येत अजून भर पडू नये, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या संकटात कोल्हापूरमध्ये अनेक घटक आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. अगदी राज्यपातळी पासून ते गाव पातळी पर्यंतचे अनेक कर्मचारी यात आपलं योगदान देत आहेत. गावात सेवा देणाऱ्या अशाच ग्रामपंचायत कर्मचारी,आशा सेविका,मदतनीस यांचा अनोखा सन्मान कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे ग्रामपंचायतीने केला आहे.

Latest News