मुंबई-पुण्यात lockdoun 18 मे होऊ शकते- राजेश टोपे

मुंबई: येत्या ४ मे रोजी देशातील लॉकडाऊन उठला तरी मुंबई आणि पुण्यातील निर्बंध १८ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. त्यांनी शनिवारी ‘मिंट’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना यासंदर्भात खुलासा केला. यावेळी टोपे यांनी म्हटले की, कोरोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे टोपे यांनी सांगितले. …तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनचा परिसर पूर्णपणे रिकामा राहील, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरांसाठी आपल्याला ३ मे नंतर आणखी १५ दिवस लॉकडाऊन वाढवावा लागू शकतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.

Latest News