मावळच्या महाविजयासाठी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडून महायुतीच्या निवडणूक प्रचार आढावा


पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा बारणे यांच्या विजयासाठी चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचाराचा पक्ष संघटनेकडून वेळोवेळी आढावा घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले जात आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक व राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी निवडणूक प्रचाराचा आढावा घेतला. मोरवाडीतील भाजपाच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून महायुतीच्या विजयासाठी प्रचार व बुथ नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी, माऊली थोरात, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, शहर भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ दुर्गे, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मंगोडेकर, शीतल शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक केशव घोळवे, यशवंत भोसले, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, कैलास कुटे, गणेश लंगोटे, राजेंद्र बाबर, शहर चिटणीस सागर फुगे, संजय कणसे, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, दिपक नागरगोजे आदी उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, “ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अब की बार…..४०० पार” हा बुलंद नारा दिला आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी १३ मे रोजी निवडणूक होत आहे. देशाला विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत बसवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भाजपाकडून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची पक्षाकडून पूर्ण तयारी सूरू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “अब की बार…..४०० पार” चा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. नमो संवाद सभांच्या माध्यमातून शहरात दररोज ७ ते ८ ठिकठिकाणी नागरिकांसोबत संवाद साधला जात आहे. सामाजिक संस्थांचे स्नेहमेळावे आयोजित करण्यात येत आहेत. त्याद्वारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १० वर्षातील विकासकामांची माहिती नागरिकांना देऊन, भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये घरोघरी प्रचार सूरू करण्यात आला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून प्रत्येक बुथवर “मेरा बूथ सबसे मजबूत” संकल्पना राबविली जात आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदार संघातून दीड लाखाहून अधिक मताधिक्य देण्यासाठी बूथ स्तरावर प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी विजयी 51 टक्के मतदान होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. बूथनिहाय मतदार चिठ्ठ्या वाटणे, बूथ प्रतिनिधी, मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी मंडल अध्यक्ष, बूथ समिती तसेच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा पक्ष संघटनेकडून वेळोवेळी आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.”