महिला पोलिसाची छेड काढल्याची तरुण पॅरोलला बाहेर येताच प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला जिवंत जाळले


प्रतापगड, उत्तर प्रदेश : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही गुंडांनी एका युवकाला झाडाला बांधून जिवंत जाळलं आहे. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनेविरूद्ध पोलिसांवर दगडफेक व गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. ही घटना फतनपूर पोलीस ठाण्यातील भुजनी गावची आहे. या युवकाच्या हत्येच्या बातमीनंतर संतप्त ग्रामस्थांनी दगडफेक करून पोलिसांच्या हलगर्जी वृत्तीचा विरोध केला. ग्रामस्थांनी दोन पोलीस जीपसह तीन वाहनांना आग लावली. पोलिसांच्या दोन्ही जीप जळून खाक झाल्या. दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले असल्याचंही सांगण्यात येत आहे. संपूर्ण घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे. मृतक अंबिका पटेल कानपूरमध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलीस शिपायावर प्रेम करत होता. महिला शिपायाच्या कुटुंबीयांनी अंबिका पटेल याला जिवंत ठार मारल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. अंबिका पटेल महिला शिपायाची छेडछाड केल्याबद्दल तुरूंगातही होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर तुरूंगातून सुटला होता. डझनभर लोक पोलिसांच्या ताब्यात या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले. गावात जाळपोळीचं तांडव झालं. पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. यादरम्यान पोलीस चार तास गावाबाहेर उभे राहिले. चार तासांनंतर एसपींसह जड पोलीस दल गावात प्रवेश करू शकलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या डझनभर लोकांना ताब्यात घेतलं. प्रयागराज झोनचे आयजी आणि एडीजीही घटनास्थळी पोहोचले. त्याने घटनेची माहितीही घेतली. त्याच गावात हत्येनंतर तणाव लक्षात घेता पीएससीच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत.
या प्रकरणात एसपी अभिषेक सिंह यांनी सांगितलेल्या माहिनीनुसार, तरूण अंबिकाला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आलं आहे. हत्येनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या तीन वाहनांना आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही महिन्यांपूर्वी कानपूरमध्ये पोस्ट केलेल्या महिला शिपायाचा फोटो मृता युवकाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. कुटुंबातील सदस्यांनी अंबिका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मृत तरुण पॅरोलला बाहेर येताच प्रेयसीच्या कुटुंबियांनी त्याला जिवंत जाळून त्याची हत्या केली.