पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी भाविक: पोलिसांनी घेतले ताब्यात

पंढरपूर – निर्जला एकादशी निमित्ताने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 16 भाविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळणे दुरापास्त झालाय . चैत्री एकादशी यात्रा रद्द झालीय. तर आषाढी ही रद्द झाल्यात जमा आहे. आषाढी यात्रेपूर्वीची मोठी एकादशी म्हणून निर्जला एकादशीचा मान आहे. त्यामुळे आज लातूर, नांदेड, सांगली , सोलापूर, उस्मानाबाद, पुणे आणि सातारा या जिल्ह्यातून दुचाकीवर भाविक दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले. मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार 

Latest News