पुण्यात कोरोनामुळे 300 हून अधिक मृत्यू

पुणे : पुण्यात कोरोनाबाधित मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात कोरोनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशाच जवळपास 297 कोरोनाबाधित मृतदेह पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलतं त्यांचे कर्तव्य बजावतात. तसेच त्यांच्यावर ते अंत्यविधी करतात.पुण्यात काल दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे मनपा हद्दीतील कोरोनाबळींची संख्या आता 320 वर पोहोचली आहे. पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेक नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत नाहीत. कधीकधी तर अंत्यविधीची संपूर्ण जबाबदारी ही पालिकेवर टाकत असल्याचे समोर आलं आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 297 मृतदेहांना महापालिका कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत पोहचवले आहे.

तसेच अंत्यविधी करणे अशी कामे केली आहेत. तर 3 बेवारस मृतदेह आणि एका निगेटिव्ह रुग्णाचाही मृतदेह पालिका कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. पुणे मनपाचे कर्मचारी अंत्यसंस्काराचे कर्तव्य बजावत आहेत. पुण्यात काल दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे मनपा हद्दीतील कोरोनाबळींची संख्या आता 320 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 57 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 529 वर गेला आहे. पुण्यात काल 168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3,950 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 2,259 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 174 रुग्ण क्रिटिकल आहेत. तर 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांवर ससून रुग्णालय, नायडू रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Latest News