चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर

मुंबई | महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. यावेळी अनेक झाडे उन्मळून पडली. अेकांच्या घरावली पत्रे हे पाला पाचोळ्यासारखी उडाली आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं. रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्याने जोरदार वेग पकडला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमीवर पोहोचला. चक्रीवादळाचा प्रभाव आजआणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. यासोबतच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.