पुण्यातील तुळशीबाग आज पासून सज्ज

पुणे: पुणे आजपासून अंशतः सुरू होणार आहे. पुण्यात महिलांमध्ये खरेदीसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, हॉंगकॉंग, मंडई लेन हे सम-विषम पद्धतीनुसार आजपासून सुरु होणार आहेत. येथील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील. पुणे महापालिकेच्या नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने सुरु होतील. मात्र याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटाईझ करणे यासारखे नियम पाळणे अनिवार्य असेल. दरम्यान, पुण्यात नवीन आदेशानुसार 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र झाली आहेत. मात्र अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या असून प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सुरु राहतील.

Latest News