जीवाचं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार धरेल : अण्णा हजारे


अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनता पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरेल, असं वक्तव्य अण्णांनी केलं आहे. ते राळेगणसिद्धीमध्ये मागील 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी 4 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.