छोट्या ”करदात्यांना” दिलासा

नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ची ४०वी परिषद आज पार पडली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार छोट्या कंपन्यांसाठी जीएसटी शुल्क उशीरा भरण्यावरील व्याज निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना आता उशिरा जीएसटी दाखल करताना ९ टक्के दराने व्याज द्यावं लागणार आहे.

छोट्या कंपन्यांना मे ते जुलै दरम्यान जीएसटी परतावा भरताना विलंब शुल्क आकारालं जाणार नाही. तसंच २ जुलै २०२० ते ३१ सप्टेंबर २०२० या कालावधीत जीएस भरणाऱ्यांसाठी हा निर्णय लागू होईल. यासह जुलै २०१७ ते जानेवारी २०२० या कालावधीतील GSTR-3B साठी विलंब शुल्क कमी करण्यात आलं आहे. जुलै २०१७ ते जानेवारी २०२० पर्यंतच्या कालावधीत अनेकांचे परतवा भरणे बाकी आहे. अशी लोकं ज्यांची कोणतीही टॅक्स लयबिलिटी नाही पंरतु त्यांनी अजूपर्यंत आपला परतावा भरलेला नाही, अशा करदात्यांना विलंब शुल्क आकाराला जाणार नाही.

Latest News