पिंपरी चिंचवड शहर हे गुन्हेगारांचे बनले। अजित पवार

उद्योगनगरी नसून गुन्हेगारांची सिटी बनली – अजीत पवार
पिंपरी, –पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्ये एका वर्षात 72 खून झाले आहेत. या शहरातील शिवसेना, भाजपचे आमदार, खासदार झोपले आहेत का. उद्योगनगरीची ओळख संपुष्टात आली आहे. या कामगारनगरीची गुन्हेगारांची सिटी अशी ओळख झाली आहे. भाजपच्या राज्यकर्त्यांना शहराचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगवी येथे केला.

निर्धार परिवर्तनाची मोहीम राष्ट्रवादीच्या वतीने सुरू केली आहे. त्यानिमित्त सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभेत पवार बोलत आहेत.

पवार म्हणातात की, मी सत्तेत असताना भाजप, शिवेसना असा भेदभाव केला नाही. समन्वय ठेवूनच कायदा व सुव्यवस्था हाताळली. पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर औरंगाबाद खंडपीठाने ठपका ठेवला. पीएमआरडीएचे कार्यालय प्राधकरणाच्या इमारतीत केले होते. बापटांनी हे कार्यालय पुण्यात हलविले. नागरिकांना चांगलं शिक्षण मिळावे. नोकरी मिळावी. त्यांना प्रशासकीय सहकार्य मिळावे म्हणून आम्ही काम केले, त्यात फेरबदल करण्याचा उद्योग केला आहे.

बोगस डिग्री घेतलेला शिक्षण मंत्री शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार?. तो तरुणांना कसं चांगले शिक्षण देईल. शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचं काम भाजपने केलं आहे. त्यांच्या आधारानच शालेय अभ्यासक्रमांत चुकीचं लिखान केलं आहे. याशिवाय, राज्यात 33 हजार अपघात झाले आहेत. चांगले रस्ते कसे असावेत हे आम्ही पिंपरी-चिंचवडकरांना दाखविले आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, राज्यातील पोलीस, आरोग्य, महसूल, उर्जा, महिला बालकल्याण अशा अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या जागा रिक्त आहेत. तरी हे सरकार जागा भरत नाही. बेकार तरुणांचं नोकरीचं वय निघून चाललंय. या दरिद्री सरकारने आपली मुलं चुकीच्या मार्गाने जावीत म्हणून डान्स बारचा निर्णय घेतला आहे. अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत, असं ही दळभद्री सरकार आहे, अशीही टिका पवार यांनी केली.

कचरा गोळा करण्यासाठी रस्त्याच्या पलीकडचं तु बघ अलीकडचं मी बघतो असे म्हणून शहराची वाटणी करून घेतली. माझ्या कार्यकाळात मी सर्वांना समान न्याय देत होतो. सकाळी सहा वाजता शहरात येऊन आयुक्तांना सोबत घेऊन शहरातली काम करत होतो. पंधरा वर्षात अवघे चार आयुक्त राष्ट्रवादीच्या कार्यकाळात होऊन गेले. भाजपच्या कार्यकाळात आहे तो पालिका आयुक्त कधी एकदा बदली होते, याची वाट पाहत आहे, असेही पवार यांनी सांगितले.

Latest News