नागपूरची ‘लुटेरी दुल्हन’ (प्रीती दास) गजाआड…


नागपूर : नागपूर पोलिसांनी अटक केलेल्या प्रिती दासने अनेक बेरोजगारांना गंडवल्याची बाब पुढे आली आहे. ‘लुटेरी दुल्हन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासवर इतरही गुन्हे दाखल आहेत. सीताबर्डीतील एनआयटी कॉम्प्लेक्समध्ये पॉश कार्यालयात तिने जॉब कन्सलटन्सी उघडली. त्यात विदर्भातील शेकडो उच्चशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातला. फसवणूक झालेल्या नवल पांडे नावाच्या बेरोजगार युवकाच्या तक्रारीवरुन सीताबर्डी पोलिसांनी प्रीती दासवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे प्रीती दासच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. प्रिती दास विरोधात खंडणी मागणे, मानसिक त्रास देणे अशा प्रकारचे गुन्हे पाचपावली पोलीस स्टेशन येथे दाखल होते. सात दिवस ती फरार होती. अखेर पोलसांनी तिला अटक केली. न्यायालयाने 17 तारखेपर्यंत प्रिती दासला पोलीस कोठडी सुनावली आहे.