सीमेवर जे घडलं त्यासाठी ”गांधी परिवाराला” जबाबदार धरू शकत नाही

मुंबई | सीमेवर घडलेल्या घटनेविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. सीमेवर जे घडलं, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना जबाबदार धरू शकत नाही, असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

20 जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. पंतप्रधान जो काही निर्णय घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील. पण, चुकीचं काय झालं हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवं, असं राऊत म्हणाले आहेत.

चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले 20 जवान शहीद झाले आहेत. आपण काय केलं? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीननं भारताच्या हद्दीत घुसला आहे का?, असे प्रश्न राऊतांनी मोदींना विचारले आहेत.

पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात. तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल. जय हिंद, असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचं आवाहन केलं आहे.