‘वेटिंग लिस्ट’ यादीतील प्रवाशांना प्रवासासाठी मनाई

पुणे – ‘वेटिंग लिस्ट’ यादीतील प्रवाशांना प्रवासासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यांनी स्टेशनवरही येऊ नये, अशी सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनी किमान तीन तास आधी येऊन आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे आवाहन केले आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काही मार्गदर्शन सूचनांच्या आधारे प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली. मात्र, प्रवासी रेल्वे स्थानकावर आल्यावर त्यांची कसून तपासणी होते. त्यानंतरच त्यांना रेल्वेत प्रवेश दिला जातो. परंतु, गेल्या काही दिवसांत रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या प्रवासीही येत आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अशा प्रवाशांना प्रवेश देता येत नसल्याने त्यांना स्थानकावरच अडवण्यात येते. प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी ‘वेटिंग लिस्ट’मधील प्रवाशांनी स्टेशनवर येऊ नये अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रवासासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कन्फर्म तिकीट असलेल्यांनी प्रस्थान वेळेच्या तीन तास आधी येऊन आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही केले आहे.

Latest News