Maharashtra Budget 2019 : २७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन २५ फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या लोकसभा पाहता एक फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला होता. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा २०१८-१९ या वर्षीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सादर करतील. सहा महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता फडणवीस सराकरही या अर्थसंकल्पात अनेक तरदुती करू शकते. यामध्ये शेतकरी, दुष्काळी भागाला मदत, जलसंपदा आणि नोकरी यावर भर असण्याची शक्यता आहे.