पीसीसीओईआरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पिंपरी (दि. 6 फेब्रुवारी 2019) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे. या उद्देशाने आयोजित केलेल्या रावेत येथील पीसीसीओईआर मध्ये झालेल्या ‘वार्षिक स्नेहसंमेलन एक्सप्रेशन 2019’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रा. प्रिया ओघे व प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांच्या संयोजनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमात समाज प्रबोधन नाटिका, कविता, नृत्य, गायन, गाणी, सादर केली तसेच मुला मुलींनी एकत्रित फॅशन शो सादर करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. महाविद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या बास्केट बॉल, फुटबॉल हॉलिबॉल, क्रिडा स्पर्धेत विजेत्या संघांना व विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) चे विश्वस्त भाईजान काझी यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रा. शाम मानकर, प्रा. सोनाली कणसे, प्रा. डॉ. राहुल मापारी, प्रा. डॉ. अर्चना चौगुले, प्रा. डॉ. समिर सावरकर, प्रा. मनिषा देशपांडे, प्रा. दिपशिखा श्रीवास्तव तसेच विद्यार्थी प्रतिक खेडेकर, अजिन अब्राहम, सुष्मिता पाटील, सुरिधा चक्रवर्ती, जागृती कोकणे, अतिक जैन, ऋषभ जैन, अतुल यादव यांनी संयोजनात सहभाग घेतला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. स्वागत नोबेल वर्गिस, सुत्रसंचालन चिराग शहा आणि आभार आसावरी कांबळे यांनी मानले.