अर्थव्यवस्थेसाठी देव जबाबदार नाही – शत्रूघ्न सिन्हा


नवी दिल्ली | भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कृपया या परिस्थितीसाठी आता देवाला जबाबदार धरु नका, असा टोला शत्रूघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. भारताचा GDP घसरल्याची बातमी ऐकली. ही खूपच निराशाजनक बातमी आहे, असं शत्रूघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. गेल्या 40 वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. कृपा करुन या परिस्थितीसाठी देवाला जबाबदार धरु नका, असं ट्विट शत्रूघ्न सिन्हा यांनी केलं आहे.
दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून दरम्यान तब्बल 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.