तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे – प्रियंका गांधी

priyanka-gandhi-3

नवी दिल्ली | काँग्रेसने आता पुन्हा एकदा बरोजगारी आणि संकटात सापडलेल्या अर्थ व्यवस्थेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एसएससी आणि रेल्वे परीक्षांच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे.

तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे, असा टोला प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. कधीपर्यंत सरकार तरूणांच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे, कधीपर्यंत?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारला केलाय.

तरूणांचं ऐका, तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे, असं ट्विट करत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून दरम्यान तब्बल 23.9 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून देखील प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

Latest News