करोनामुळे मृत्यू होत नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकरांचा दावा

FB_IMG_1598970127519

करोनामुळे मृत्यू होत नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुणे( प्रतिनिधी )देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. करोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “करोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असा दावा केला आहे. करोना आहे, यावरही आपला विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली. ‘धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे?’ असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारला करोनाविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतं. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे. आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केलं. हे शासन करोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. करोना आहे, यावर माझा विश्वास नाही,” असं आंबेडकर म्हणाले. ‘महाराष्ट्रात दररोज दोनशे ते अडीशे लोकांचा मृत्यू करोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटते की सरकार करोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे?, करोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?’ या प्रश्नावर भूमिक

Latest News