पुणे : सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघे जखमी

cilender-spot

पुणे : घरातील गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाच कुटूंबातील तिघेजण जखमी झाले. ही घटना आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास वडगाव शेरीत घडली स्फोटात घराचे मोठे नुकसान झाले आहे. बाळासाहेब आप्पासाहेब भोंडवे (वय 50), मीरा बाळासाहेब भोंडवे (वय 45) व अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय 21, सर्व रा. गणेशनगर, वडगाव शेरी) अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अग्निशमक दलाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरातील गणेशनगर येथे भोंडवे कुटुंबिय राहते. इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटातघराच्या भिंताही पडल्या आहेत. तर अनुराधा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. स्फोटात तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच येरवडा आणि हडपसर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. नागरिकांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर घरातील आग विझवत पडलेली भिंत बाजूला काढली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून काम सुरू आहे.

Latest News