पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ


पुणे | ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचेपर्यंत पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली. पांडुरंगच्या मृत्यूला व्यवस्थेतील त्रुटी जबाबदार, मी मान्य करतो, असं मोहोळ यांनी म्हटलंय. पांडुरंग आपल्यातून जाणं ही निश्चितच आपल्यासाठी धक्कादायक बाब आहे. ही दुर्देवी घटना आहे. गेले पाच महिने ते पुण्यातील कोरोना स्थितीवर त्यांचं बारीक निरीक्षण होतं. त्यांनी खूप काम केलं, असंही मोहोळ म्हणाले. व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी दोष असतील, कोणतीही यंत्रणा असेल, महापालिका रुग्णालय किंवा राज्य शासनाने उभारलेले जम्बो हॉस्पिटल असेल ही जबाबदारी कोणी कोणावर न ढकलता ही स्वीकारली पाहिजे, असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.