भारतीय टपाल विभागातील हजारो पदांवर भरती

post-a

भारतीय टपाल विभागातील हजारो पदांवर बंपर रिक्त पदांवर भरती काढण्यात आली आहे. तामिळनाडू सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या 3000हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टपाल खात्यात जीडीएस पदांवर नोकरी मिळविण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट appost.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

पदांची संख्या
तामिळनाडू पोस्टल सर्कल भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक(जीडीएस)च्या 3162 पदांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी
टपाल खात्यात जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 40 वर्षे निश्चित केले गेले आहे. महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 01 सप्टेंबर 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020

अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. एससी/एसटी वर्ग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

अर्ज कसा करावा
भारतीय टपाल खात्याच्या तामिळनाडू सर्कलमध्ये या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ appost.in वर भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.

Latest News