महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांना तातडीने बेड्स उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी – शरद पवार

pawar-pcmmc

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे हि चांगली बाब असून महानगरपालिकेने कोरोना बाधित रुग्णांना तातडीने बेड्स उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केलेल्या विविध उपायोजना व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज सायंकाळी खासदार शरद पवार महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते. कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी महानगरपालिके तर्फे तयार करण्यात आलेल्या वॉररूमला त्यांनी भेट दिली.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. खासदार शरद पवार यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉररूममार्फत सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली तसेच महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केलेल्या विविध उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती दिली.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्य योगेश बहल, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, मयूर कलाटे, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.

Latest News