कंगणाला पाठींबा देणाऱ्या राम कदम यांचीच नार्को टेस्ट करा – सचिन सावंत


मुंबई | राज्यात कंगणावरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी अभिनेत्री कंगणा राणावतला पाठींबा दिला होता. मात्र यावरून काँग्रेसने त्यांना घेरलं आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कदमांवर निशाणा साधत भाजपरवही टीकास्त्र सोडलं आहे.
विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूडचे संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजप कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता आणि भाजपचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपने कंगणाचा निषेध केला नाही. कंगना आणि राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
दरम्यान, राऊत यांनी कंगणाला फटकारल्यानंतर राम कदम यांनी तिला पाठींबा देत म्हटलं होतं की, कंगणा झाशीची राणी आहे ती धमक्यांना घाबरणारी नाही. मात्र मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यामुळे कंगणा ही मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.