उर्मिला मातोंडकरांनी कंगणाला खडसावलं

kanganaranaut-1599197194

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं वाटतं, असं म्हटलं होतं. कंगणाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही कंगणाला खडसावलं आहे.

महाराष्ट्र भारताचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा आहे. महान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. मुंबईने कोट्यवधी भारतीयांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली आहे, तसेच त्यांना नावही दिलं आहे. त्यामुळे केवळ कृतघ्न लोकच तिची तुलना पीओकेशी करू शकतात, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे. कंगणाने राऊत यांना उत्तर देताना म्हटलं होतं की,आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी भासू लागली आहे, त्यामुळे तिला सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतलं आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…, असं म्हणत मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही निषेध व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी #kanganavirus असा वापरला

Latest News