भोपाळ: बडतर्फ IAS दाम्पत्याकडे सापडली तब्बल 100 कोटींची बेहिशोबी मालमत्ता

bhopal-joshi

भोपाळ | भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आलेल्या आयएएस दाम्पत्याची एकूण मालमत्ता पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. कारण या दाम्पत्याची एकूण मालमत्ता ही 100 कोटी इतकी आहे. अरविंद जोशी आणि टीनू जोशी असं संबंधित आयएएस दाम्पत्याचं नाव आहे. 2010 साली आयकर विभागाने फेब्रूवारी महिन्यात जोशी यांच्या भोपाळमधीळ घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यावेळी आयकर विभागाला जवळजवळ तीन कोटी रूपये आणि काही महत्वाची कागदपत्र सापडली होती. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अरविंद आणि टीनू यांनी उच्च न्यायालयात सहा वेळा याचिका दाखल केल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचीका रद्द करून जोशी या दाम्पत्याला संपत्तीसंदर्भात उत्तर मागण्यात आलं होतं. मात्र जोशी दाम्पत्याला यावर संपत्तीचा कोणताही तपशील न्यायालयासमोर सादर करता आला नाही.  त्यामुळे जोशी दाम्पत्यांची संपत्ती ही कायदेशीर पद्धतीने कमावली नसून त्यांनी बेकायदेशीर असून 100 कोटी हे बेनामी असल्यााचा ठपका ठेऊन आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली आहे.

दरम्यान, जोशी दाम्पत्याच्या 100 कोटींच्या संपत्तीमध्ये 220 एकर शेतजमीन, फ्लॉट आणि वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेले जमीनीचे तुकडे त्यासोबतच चार कोटींच्या विमा पॉलिसी दोघांच्या नावावर आहेत.

Latest News