खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार

मुंबई : राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शासकीय सेवेत थेट संधी मिळालेल्या खेळाडूंचा उपयोग नवीन खेळाडू घडवण्यासाठी व क्रीडा विकासाठी करता येईल, अशा धोरणाबाबत विचार होणार आहे. तर राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं आणि या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा धोरणात बदल करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक पार पडली. सुधारित धोरणामध्ये गिर्यारोहणासारखे साहसी क्रीडाप्रकार, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आदींबाबतही विचार करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

Latest News