पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ
पुणे – पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे निरीक्षण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नोंदविले आहे. 2018 मध्ये राज्यात या गुन्ह्यांत 10.95 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशात 2018 मध्ये 31 लाख 32 हजार 954 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी महाराष्ट्रात 3 लाख 46 हजार 291 गुन्हे दाखल झाले होते. अन्य राज्यांच्या तुलनेत गुन्हे घडण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील गुन्हे-2018 या वार्षिक अहवालात महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक 6 हजार 58 गुन्हे मुंबईत दाखल झाले.
गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण विचारात घेता अमरावती शहराची टक्केवारी जास्त आहे. 2017 च्या तुलनेत राज्यात 2018 मध्ये अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांमध्ये 13.36 टक्के वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
2018 मध्ये राज्यात 17 हजार 972 जणांनी आत्महत्या केली. रस्ते अपघातात 13 हजार 863 जण मृत्यू झाला. देशात 2018 मध्ये 21 हजार 19 खून झाले. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहता महाराष्ट्राचा क्रमांक 14 वा आहे.
2018 मध्ये देशात 200 गुन्हे दाखल झाले होते. हुंडाबळीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहता महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. 2018 मध्ये भारतात बलात्काराचे 21 हजार 42 गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता महाराष्ट्र देशात 22 व्या क्रमांकावर आहे.