मोदी सरकारचा विचार कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खाजगीकरण

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार विरोधात त्यांनी पोलखोलसाठी मालिकाच सुरूच केली आहे. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन अशा महत्वांच्या मुद्दाद्वारे राहुल गांधी सरकारची पोलखोल करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकतचं राहुल गांधींनी नोकर भरतीविषयी आपले मत व्यक्त केले आहे. “मोदी सरकारचा विचार कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खाजगीकरण करणं असा आहे. कोरोना फक्त निमित्त आहे.” असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले आहे.
मोदी सरकारला देशातील सरकारी कार्यालयांना कर्मचारीमुक्त करायचं आहे. तसेच आपल्या मित्रांच्या मदतीने खाजगीकरण करून त्यांना पुढे आणायचे आहे. असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले आहे. दरम्यान, देशातील 12 कोटी रोजगार गेले आहेत. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था कुठेच दिसत नाही. सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब आहे, देशाचा विकास आणि सुरक्षा देखील कुठेच दिसेना, प्रश्न विचारले तर उत्तरं गायब आहेत, असं सांगत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.