विनामास्क: पुण्यात 1 कोटी 13 लाखाचा दंड वसूल!

पुणे | पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तरीही लोक मास्क न लावता फिरत आहे. आशा बेजबाबदार नागरिकांकडून आत्तापर्यंत पोलिस आणि ग्रामपंचायतीने 1 कोटी 13 लाखांचा दंड वसूल केला आहे. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यापासुन नागरीकांमधील आजाराविषयीचं गांभीर्य कमी झालं आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरीही या स्थितीत नागरिक बिनधास्त बाहेर फिरत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर शासनाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पोलिस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने आत्तापर्यंत 40 हजार 255 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई हवेलीत 4 हजार 557 नागरिकांवर करत ग्रामपंचायतीने 14 लाख 5 हजार वसूल केले. तर पोलिसांनी 3 हजार 321 नागरिकांवर कारवाई करत 7 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दरम्यान, शहरासह आता गावातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थित नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेण्याची वेळ आली आहे.

Latest News