पिंपरी शहर निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलावर अत्याचार करुन त्याचा खून

पिंपरी | निवृत्त सहायक फौजदाराच्या मुलावर अत्याचार करुन त्याचा खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह पुरुन आरोपी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुन आणि अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव संतोष शेषराव अंगरख असं आहे. याचं वय 42 वर्ष आहे. तर निवृत्त सहायक फौजदार वडिलांचं नाव शेषराव रंगनाथ अंगरख असं आहे. हा प्रकार पैशांवरुन घडला असल्याचं समोर आलं आहे. ही घटना 2 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. संतोष हे मेडिकल साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय करतं होते. 16 सप्टेंबर रोजी संतोष बेपत्ता झाले होते. संतोष यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आरोपी गणेश याच्याकडून पैसे घेतले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. हे कळाल्यावर शेषराव यांनी वाकड पोलिस स्टेशनमधी गणेश बरोबर त्यांच्या सोबतच्या अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखलं केला आहे. दरम्यान, वाकड पोलिसांनी मृतदेह पुरुन फरार झालेल्या आरोपींपैकी एक आरोपी गणेश सुभेदार पवार याला ताब्यात घेतलं आहे. तसेच अन्य दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.